बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१२

ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ - कार्यक्रमांचे वेळापत्रक

खगोल विश्व : ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ - कार्यक्रमांचे वेळापत्रक 



मॉन्सूनचे ढगाळ हवामान संपत आले आहे. आकाश मोकळे होत असतानाच पुढील सलग तीन महिने उल्कावर्षावांना चंद्राचीही साथ लाभणार आहे. ऑक्टोबरमधील ओरीओनिड (२०/२१ ऑक्ट.), नोव्हेंबर मधील लिओनिड (१७/१८ नोव्हे.) आणि डिसेंबरमधील जेमिनीड (१३/१४ डिसेंबर) या तिन्ही उल्कावर्षावांना चंद्र अनुकूल स्थितीत आहे. या संधीचा लाभ घेऊन खगोल विश्वतर्फे २० ऑक्टोबर पासून विंटर सेशन सुरु होत आहे. या सेशनमध्ये उल्कावर्षावांच्या साईंटीफिक निरीक्षणांना सुरुवात होत आहेच, पण याबरोबर नवीन मेम्बर्ससाठी आकाश निरीक्षणाचा बेसिक कोर्सही सुरु होत आहे. त्याच बरोबर जुन्या मेम्बर्ससाठी फोटोग्राफी आणि रेडीओ ओब्झर्वेशनचे वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आहेत.
येत्या काळातील खगोल विश्वच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्या माहितीसाठी देत आहोत. आपला सहभाग जरूर नोंदवा.

ऑक्टोबर २०१२ 
आकाश दर्शन आणि उल्कावर्षाव निरीक्षण 
२० ऑक्टोबर रात्री ८ ते २१ ऑक्टोबर सकाळी ६ 
स्थळ: पानशेत 
गाडीची व्यवस्था: आहे
शुल्क: ३५०/- गाडीसह २५०/- (स्वतःच्या गाडीने)
कार्यक्रम: रात्रीच्या आकाशाची ओळख, दुर्बिणीसह आकाशदर्शन, स्लाईड शो, फिल्म्स, उल्का वर्षाव निरीक्षण


नोव्हेंबर २०१२  
राज्यस्तरीय हौशी आकाश निरीक्षकांचे संमेलन
१६ ते १९ नोव्हेंबर (निवासी) 
स्थळ: फुलगाव, पुणे- नगर रस्ता (पुण्यापासून २५ किलोमीटर)
कार्यक्रम
महाराष्ट्रातील हौशी आकाश निरीक्षकांच्या संस्थांची ओळख
महाराष्ट्रातील हौशी आकाश निरीक्षण
वर्कशॉप: फोटोग्राफी, रिडिओ ओब्झर्वेशन
लेक्चर: खगोल प्रसारातील नवी साधने आणि सोर्स, खगोलीय घटनांची शास्त्रीय निरीक्षणे
चर्चा: महाराष्ट्रातील खगोल संस्थांचे नेट्वर्किंग          
विजीट: जीएमआरटी- तज्ञांबरोबर रात्रभर निरीक्षण 
शुल्क: ६००/- [भोजन, निवास, प्रवास( पुणे- फुलगाव- पुणे)  सर्व खर्चासह]      

लिओनिड उल्कावर्षाव 
१७-१८ नोव्हेंबर (शनिवार रात्र)

डिसेंबर २०१२  

जेमिनीड उल्का वर्षाव 
१३-१४ डिसेंबर (गुरुवार रात्र)
निरीक्षण
स्थळ: पानशेत
गाडीची सोय: नाही 
शुल्क: आपापला प्रवास खर्च (चहा आणि इतर सोयींचे कॉंट्रीब्युशन)




आकाशदर्शन   
१५-१६ डिसेंबर (शनिवार रात्र)
स्थळ: पानशेत
गाडीची सोय: आहे
शुल्क: ३५०/- (गाडीने), २५० (स्वतःच्या गाडीने)
कार्यक्रम:  रात्रीच्या आकाशाची ओळख, दुर्बिणीसह आकाशदर्शन, स्लाईड शो, फिल्म्स, उल्का वर्षाव निरीक्षण



आपला सहभाग नोंदवण्यासाठी ९४२०७५९४९० किंवा ९९२३२६८७२८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.